साहित्य लेखन कार्यशाळा

गणपत पार्सेकर शिक्षण शास्त्र महाविद्यालय, मराठी विभाग आणि राज भाषा संचालनालय गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी, महाविद्यालयाच्या सभागृहात राज्य स्तरीय साहित्य लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. ही कार्यशाळा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून घेण्यात आली. राज्यातील विविध भागातील विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील प्रसिद्ध सिने अभिनेते तथा व्हॉईस आर्टिस्ट श्री. नरेश गुंड आणि प्रसिद्ध शिक्षण तज्ञ डॉ. तरुजा भोसले मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या.

या कार्यशाळेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरेश गुंड , खास निमंत्रित डॉ. तरुजा भोसले, हरमल पंचक्रोशी विद्यसंकुलाचे अध्यक्ष प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर, राजभाषा संचालनालय गोवा सरकारचे उप संचालक श्री. अनिल सावंत, गणपत पार्सेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग पंडित, मराठी विभाग प्रमुख डॉ. गीता येर्लेकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. दुर्गेश माजिक आणि प्रा. ओंकार गोवेकर उपस्थित होते.

Skip to content Click to listen highlighted text!