शिवजयंती
मराठी विभाग आणि ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजयंती’ निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक नाट्यप्रवेश वाचन स्पर्धेतील काही क्षणचित्रे…
सदर स्पर्धा आंतर महाविद्यालयीन स्तरावर आयोजित करण्यात आली होती. एकूण ७ महाविद्यालये या स्पर्धेत सहभागी झाली होती. त्यात विद्या प्रबोधिनी, परवरी प्रथम, शासकीय महविद्यालय केपे द्वितीय, आणि सारस्वत महाविद्यालय म्हापसा यांनी तृतीय क्रमांक पटकावला.